top of page

समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तक्रार दिल्यानंतर कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

ree

नवी मुंबईमधील वाशी येथील सद्गुरु बार आणि रेस्तराँचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावे होता हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. १९९६-९७ मध्ये समीर वानखेडेंचे वय १८ पेक्षा कमी होते. तरीही करार करण्यास पात्र नसताना त्यांनी ठाण्यातील सद्गुरु बार आणि रेस्तराँच्या करारनाम्यात स्टॅम्प पेपरवर आपलं वय लपवलं होतं. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
 
 

Comments


bottom of page