top of page

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?

मुंबई :बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आह़े याबाबत त्यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) पत्र पाठवले आह़े यामुळे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ree

‘‘या संदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. ‘सीआरपीसी’च्या कलम ३०६, ३०७ नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो’’, असे पत्र वाझेंनी ‘ईडी’चे सहाय्यक संचालक तसीन सुल्तान यांना लिहिले आहे. या प्रकरणाबाबत आता ‘ईडी’चे अधिकारी विशेष पीएमएलए न्यायालयाच्या परवानगीने वाझेंचा जबाब महादंडाधिकाऱ्यापुढे सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत नोंदवू शकतात़.


 
 
 

Comments


bottom of page