top of page

रेमडेसिव्हीर प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करण्याचे आदेश; सुजय विखे-पाटलांना धक्का

औरंगाबाद : राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असताना हवाईमार्गे थेट दिल्लीहून इंजेक्शन आणल्याप्रकरणी भाजप खासदार सुजय विखे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढली आहे. कोर्टाने पोलिसांना या प्रकरणी स्वतंत्रपणे तपास करण्याची सूचना केली आहे. यामुळे सुजय विखे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ree

कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना या प्रकरणातील आणखी काही कागदपत्रे पोलीस ठाण्याला देण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. तपास अधिकाऱ्यांनी योग्य तो तपास केल्यानंतर फौजदारी प्रक्रियेच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, कोणताही अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा अन्य कोणी या प्रकरणात बनावट कागदपत्रे बनवत असेल त्यांच्या विरुद्धदेखील तक्रार देण्याची तसेच तपास अधिकाऱ्याने योग्य प्रकारे कार्यवाही न केल्यास परत न्यायालयात येण्याची मुभासुद्धा कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिली आहे.


 
 
 

Comments


bottom of page