top of page

सोलापूर विद्यापीठातर्फे शनिवारी परंपरा स्मृति संगीतसभेचे आयोजन

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ललितकला व कला संकुलाततर्फे गानमहर्षी उस्ताद अल्लादिया खान व उस्ताद अहमदजान थिरकवा यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, 20 मार्च 2021 रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने परंपरा स्मृती संगीत सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका डॉ. माया पाटील यांनी दिली.


कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शहा, गानगुरु पंडित अरुण कुलकर्णी, पंडित अमोद दंडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


या कार्यक्रमात मयूर स्वामी, सोलापूर, संकेत खलप, गोवा, अमोल राबाडे, कोल्हापूर, सतीश तारे व आशिष तारे, अमेरिका हे विद्यार्थी कलाकार सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. आनंद धर्माधिकारी, प्रा. दीपक दाभाडे, प्रा. विशाल सोमवंशी, प्रा. अमोल देशमुख व प्रा. कैलास नेरकर हे करीत आहेत. https://www.youtube.com/channel/UCcKzRB85zSvkMsy1rW_tM9Q या लिंकवर नागरिकांना कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.

 
 
 

Comments


bottom of page