top of page

५०० टन वजनाचा पोलादी पूल चोरीला... विश्वास बसत नाही ना...पण हे खरे आहे...

५०० टन वजनाचा ... ६० फूट लांबीचा पोलादी पूल चोरीला गेल्याची घटना घडली आहे... विश्वास बसत नाही ना,.,,पण हे खरे आहे...बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील सासाराम येथे भरदिवसा पोलादी पुलाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी असल्याचे भासवून चोरट्यांनी ६० फूट लांबीचा पोलादी पूल सुटा करून चोरून नेला आहे. चोरीच्या तीन दिवसांनंतर पाटबंधारे विभागाकडून त्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


नासीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमियावर खेडय़ातील आरा कालव्यावर १९७२ साली ५०० टन वजनाचा हा पूल बांधण्यात आला होता. पोलादी पुलाला धोकादायक घोषित केल्यामुळे स्थानिक लोक लगतच्या काँक्रीट पुलाचा वापर करत आहेत. पाटबंधारे खात्याचे अधिकारी असल्याचे भासवून चोरट्यांनी हा निकामी पूल गॅस कटर, जेसीबी व अन्य उपकरणांच्या मदतीने तीन दिवसांत सुटा केला व चोरून नेला, अशी माहिती पोलिसांनी दिली.


 
 
 

Comments


bottom of page