top of page

सर्वधर्मिय विधवांचा विवाह व त्यांच्या पुनर्वसनासाठी १५ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय मेळावा

सोलापूर : श्री लक्ष्मी नारायण वधु-वर सूचक केंद्राच्या विद्यमाने सर्वधर्मिय प्रथम वधु-वर ,विधवा, विधूर, घटस्फोटित, आंतरजातीय वधु-वर पालकांचा महाष्ट्र व कर्नाटक राज्यस्तरीय मेळावा रविवार दि. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक नंदकुमार शिंदे यांनी दिली.

ree

तरुण वयात अकाली वैधव्य प्राप्त झालेल्या कितीतरी महिलांना यातना व समस्यांना तोंड द्यावे लागते. शैक्षणिक, गुणवत्ता नसल्यास पूर्णत: पालकांवर आवलंबून राहून अवहेलना सहन कराव्या लागतात याचा सर्वांगिण गुणवत्ता विचार करुन सर्वधर्मिय विधवांचा विवाह व त्यांचे पुनर्वसन करण्याच्या सामाजिक सद्भावनेने सदरचा मेळावा नंदकुमार शिंदे सोलापूर येथे आयोजित केला आहे. सध्या मंडळाकडे सर्वधर्मिय २४ विधवा महिलांनी नांव नोंदणी केलेली संयोजक असून विधूर, घटस्फोटीत,आंतरजातीय अशा सुमारे २१५ विवाहोच्छुक वधु-वरांनी मंडळाकडे नाव नोंदणी केली आहे.

मंडळाकडे नाव नोंदणी केल्यानंतर दर सोमवारी स्थळांची माहिती मिळण्याची कार्यवाही मंडळाने कार्यान्वित केलीआहे. तरी सोलापूरसह महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वधर्मिय समाज बांधवांनी आपल्या ज्ञात असलेल्या वधु-वरांची नावे, पोस्टकार्ड साईज फोटोसह मंडळाच्या विहित छापील फॉर्ममध्ये समक्ष दुर्वांकूर अपार्टमेंट, डॉ. नान्नजकर समोर, दमाणीनगर, सोलापूर या पत्यावर सकाळी १० ते सायं.६ या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन केंद्र संचालिका सौ. अंजली शिंदे यांनी केले आहे.


 
 
 

Comments


bottom of page