top of page

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

राज्यात दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली होती. दरम्यान, यासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि एसटी कामगार संघटना यांच्यात बैठक झाली.या बैठकीत तोडगा निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केलं आहे.




ree

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ करण्याचे मान्य केलं आहे. तसेच ज्यांना कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल झाल्याने बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा कामावर घेण्याचंही सरकारने मान्य केलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केलं आहे.



 
 
 

Comments


bottom of page