top of page

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी; २०२७ वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

1 day ago
1 min read

Updated: 20 hours ago


भारत-पाकिस्तान एकाच गटात


आयसीसीने २०२७ वनडे विश्वचषकाचे (ODI World Cup 2027) संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेची सुरुवात २ ऑक्टोबर २०२७ ला होणार आहे. तर अंतिम सामना हा २१ नोव्हेंबर २०२७ रोजी खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांत ही स्पर्धा होणार असून १४ संघ सहभागी होणार आहेत.


भारत आणि पाकिस्तान हे मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पात्रता फेरी ‘अ’ संघांचा समावेश आहे. तर गट बमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि पात्रता फेरी ‘ब’ संघांचा समावेश करण्यात आला आहे.


भारताचा पहिला सामना ७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असून, बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना १० ऑक्टोबरला जोहान्सबर्ग येथे होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २१ नोव्हेंबरला जोहान्सबर्ग येथे होईल. रोहित शर्मा- विराट कोहली यांच्या कारकीर्दीचा हा शेवटचा वनडे वर्ल्डकप ठरणार असल्याने भारतीय चाहत्यांना त्यांना शेवटचा वर्ल्डकप खेळताना पाहायचं आहे..


Comments


bottom of page