top of page

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार

राज्य शिक्षण मंडळाची घोषणा

ree

दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ४० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल. सकाळच्या सत्रातील पेपर १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटे देण्यात येईल. कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. शाळा तिथं परीक्षा केंद्र असणार. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत परीक्षा केंद्र असेल. तसंच १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचं महाविद्यालय केंद्र असणार आहे.


 
 
 

Comments


bottom of page