top of page

सुशांत सिंह प्रकरणी CBIने मागितली अमेरिकेची मदत

डिलीट केलेल्या चॅट आणि ईमेलची चौकशी होणार

सुशांत सिंह राजपूत गेल्या वर्षी १४ जून रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. १४ जून २०२० रोजी असे काय घडले होते याचा तपास सीबीआयला करायचा आहे. यासाठी सुशांतसिंह याच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सची डिलीट केलेली माहिती मिळवण्यासाठी सीबीआयने अमेरिकन कंपन्यांकडून मदत मागितली आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

ree

सीबीआयने ही माहिती एमएलएटी म्हणजेच परस्पर कायदेशीर सहाय्य करारांतर्गत कॅलिफोर्नियास्थित गुगल आणि फेसबुककडून मागवली आहे. डिलीट केलेल्या मेल्स आणि चॅटची सर्व माहिती दोन्ही कंपन्यांकडून मागवण्यात आली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात एक एमएलएटी आहे ज्या अंतर्गत दोन्ही बाजू देशांतर्गत प्रकरणांच्या तपासात माहिती घेऊ शकतात. एमएलएटी अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो.


 
 
 

Comments


bottom of page