top of page

आर्यन खान प्रकरणावर शाहरुख मौन सोडणार?

आर्यन खान प्रकरणावर आता बॉलिवूडचा बादशहा व आर्यनचा पिता शाहरुख खान पहिल्यांदाच मौन सोडणार असल्याचं समोर येत आहे. शाहरुख खान आपल्या संपूर्ण टीमसह दिल्लीहुन मुबईला परतला. त्याला आज दुपारी मुंबई विमानातळावर पाहीलं गेलं आहे. आतापर्यंत शाहरुखने या प्रकरणावर मौन बाळगलेलं आहे. मात्र, आता शाहरुख या प्रकरणावरील मौन लवकरच सोडू शकतो, असं माध्यमांवरील वृत्तांवरून दिसून येत आहे .

शाहरुखला अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी मुलाखतीसाठी संपर्क साधला असल्याचे माध्यमांवरील बातम्यावरून दिसून येत आहे.

इंडिया टुडेने दिलेले वृत्तानुसार, शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीशी इंग्लड आणि अमेरिकेतील अनेक वृत्तवाहिन्यांनी आर्यन ड्रग्ज केस प्रकरणी शाहरुख खानच्या मुलाखतीसाठी संपर्क साधला आहे. शिवाय, अशी देखील माहिती समोर येत आहे की शाहरुख लवकरच याप्रकरणावरील मौन सोडून, आपली भूमिका स्पष्ट करू शकतो. मात्र याबाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


Comments


bottom of page