top of page

देवेंद्र फडणवीस यांनी जो मार्ग दाखवला होता, त्याच मार्गानं ....

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यभर आंदोलन झाली. राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत या सर्व पार्शवभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत आलेला निर्णय दुर्दैवी आहे. मराठा आरक्षण कोणाला नको आहे? मराठा आरक्षण हे सर्वांना हवं आहे. चंद्रकांत पाटील, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अजित पवार या सर्वांना मराठा आरक्षण हवं आहे.

ree

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो मार्ग दाखवला होता त्याच मार्गावर हे सरकार चाललं होतं, त्याच मार्गाने पुढील काम चालू आहे. त्यांनीच नेमलेले वकील कायम आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.


फडणवीस यांनी यामध्ये राजकारण न करता कशाप्रकारे मार्ग काढता येईल यासाठी पुढे आलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारला अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालय सांगत आहे. आम्ही हा कायदा मंजूर करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाऊ. विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्यासोबत यावं, त्यांनी नेतृत्व करावं, असं संजय राऊत यांनी बोलताना सांगितले.

राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असल्याच्या टीकेवर उत्तर देताना ते म्हणाले की, “आम्ही बोट दाखवलं नसून सर्वोच्च न्यायालय बोट दाखवत आहे. आम्हाला बोट, हातही दाखवायचा नाही, त्यांच्याकडे नजर वळून सुद्धा बघायचं नाही ”. संभाजीराजे एक वर्षांपासून भेटीची वेळ मागत आहेत त्यांना का वेळ मिळत नाही? या उद्धव ठाकरेंच्या टीकेचा संजय राऊतांनीही पुनरुच्चार केला.



 
 
 

Comments


bottom of page