top of page

ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी दाखल: चौकशी सुरु...

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी आज सकाळी सात वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. ईडीने याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. राज्य सरकार आणि केंद्राचं सुरक्षा पथकही घराबाहेर तैनात करण्यात आले . पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

ree

यापूर्वीही संजय राऊत यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यांना ईडीने २७ जुलै रोजी समन्स बजावलं होतं. मात्र, ते अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे आता ईडी थेट राऊत यांच्या यांच्या घरी पोहोचले आहेत. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना चौकशीसाठी आपल्या कार्यालयात नेणार का आणि त्यांना अटक करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



Comments


bottom of page