top of page

... म्हणून चर्चांमध्ये सहभागी होणार नाही

पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभेचे निवडणूक निकाल जाहीर झाले असून वृत्तवाहिन्यांवरील निवडणूक निकालांवरील चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत दिली आहे.

ree

जेव्हा देश एका अभूतपूर्व संकटाला सामोरा जात आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले आहे. आपण त्यांना जबाबदार धरायला नको आणि त्याचबरोबर निवडणुकीतील विजय आणि पराभव यावर चर्चा करणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीवरील वादविवाद चर्चांमध्ये आमचे प्रवक्ते सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला असल्याचे सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page