top of page

रशियाची 'स्पुटनिक-व्ही' लस पुढील आठवड्यापासून होणार उपलब्ध

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. यामुळे १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणही खोळंबले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात पुढच्या आठवड्यापासून रशियाची स्पुतनिक लस बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली आहे. दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे.

ree

भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंतची लसींची उपलब्धता पाहता एकूण २१६ कोटी डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यापैकी ५५ कोटी डोस हे कोवॅक्सिन, ७५ कोटी कोविशिल्ड, ३० कोटी बायो ई सब युनिट लसीचे, ५ कोटी जायडस कॅडिला डीएनए, २० कोटी नोवा लसीचे, १० कोटी भारत बायोटेकच्या नेजल लसीचे, ६ कोटी जिनोवा आणि १५ कोटी डोस पुतनिक लसीचे उपलब्ध होतील, अशी माहिती डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.


 
 
 

Comments


bottom of page