top of page

"दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी आम्ही तेव्हा सायकलवरुन जेजुरीला गेलो होतो"

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानं बोललीवूडसह सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक राजकीय नेते, अभिनेते यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "आम्हा दोघांचं एक वेगळंच नातं होतं" असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देताना दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ree

त्यांनी दिलीप कुमार यांना पहिल्यांदा पाहिल्याचा जेजुरीतील किस्साही सांगितला. "जेजुरीत दिलीप कुमार यांच्या नया दौर या चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं. त्यावेळी दिलीप कुमार यांची क्रेझ होती. शुटिंगची आम्हाला कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं," असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

नंतरच्या काळात विधिमंडळात राज्य सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दिलीप कुमार आणि माझी मैत्री झाली. आमचं वेगळं नातं निर्माण झालं. माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते माझा प्रचार करण्यासाठी एखाद दुसरी सभा घ्यायचे, ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते, अशा शब्दात शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या.


 
 
 

Comments


bottom of page