top of page

शरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ree

नाशिकचे नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. पण उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर नाशिकच्या नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. ए.एस.बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने पवार कुटुंबीयांना नोटीस बजावली आहे. तसेच या याचिकेत कृष्णा खोरे विकास महामंडळ, लवासा कॉर्पोरेशन, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन,पुण्याचे जिल्हाधिकारी,राज्याचे विकास आयुक्त यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.



 
 
 

Comments


bottom of page