top of page

१२५ तास रेकॉर्डिंग... ही कौतुकास्पद बाब…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्ह सादर करुन १२५ तासांचं रेकॉर्डींग दिलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ree

यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपलं मत मांडले. तपास यंत्रणांचा वापर करूनही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, १२५ तासांचं रेकॉर्डिंग करण्यासाठी देवेंद्र फडणवीस अथवा त्यांचे कुणीतरी सहकारी यशस्वी झाले आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. १२५ तास रेकॉर्डिंग करायचं काम केलं जर असेल तर त्यासाठी तशा शक्तीशाली एजन्सीजचा वापर केल्याची शक्यता नाकारता येत नाहीत. अशा एजन्सीज फक्त भारत सरकारकडे असल्याने त्यांचा वापर झालेला असू शकतो. हे सिद्ध व्हायला हवं यासाठी राज्य सरकार नक्कीच तपास करेल. माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा काही संबंध नसल्याचं शऱद पवारांनी यावेळी सांगितलं.


ते म्हणाले की, “या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता असत्यता तपासेल. कधी काळी वर्ष सहा महिन्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबत तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं त्यात सत्यता किती तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे”.


नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. “नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नाही. नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून मुस्लिम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायचं हे घृणास्पद आहे,” असं शरद पवार म्हणाले.

 
 
 

Comments


bottom of page