top of page

Video : अखिलेश यादव यांच्यासमोरच नेत्याने जिल्हाध्यक्षांना कानाखाली लगावण्यासाठी उचलला हात ...

उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एका प्रचारसभेत अखिलेश यादव यांच्यासमोरच नेत्याने जिल्हाध्यक्षांना कानाखाली लगावण्यासाठी हात उचलला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ree

रविवारी अखिलेश यादव बाह विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मधुसूदन शर्मा यांच्या प्रचारासाठी पोहोचले होते. अखिलेश यादव यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष जितेंद्र वर्मा यांच्यासोबत बसले होते. जितेंद्र वर्मा आणि अखिलेश यादव आपापसात बोलत होते. याचवेळी माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव रामजीलाल सुमन सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत मी त्यांना माजी नाही तर भावी मुख्यमंत्री म्हणेन असं सांगितलं. कारण ते १० मार्चनंतर राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.

जितेंद्र वर्मा यांच्यासोबत बोलत असल्याने अखिलेश यादव यांनी कदाचित रामजीलाल सुमन यांचं वक्तव्य ऐकलं नाही.आपलं भाषण सुरु असताना वारंवार अखिलेश यादवांशी चर्चा करत असल्यानेच महासचिव संतपाले आणि अखिलेश यादव यांच्यासमोरच हात उचलण्यासाठी गेले. त्यांनी जितेंद्र वर्मा यांना कानाखाली मारण्यासाठी हात दाखवला पण तितक्यात अखिलेश यादव यांनी रोखलं.


 
 
 

Comments


bottom of page