top of page

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ३० जून रोजी ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आलं आहे. नेमक्या कोणत्या प्रकरणात ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.

ree


आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचं नाव समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. ५ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.


Comments


bottom of page