top of page

शरद पवार यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचं निष्पन्न झालं आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचंही ते म्हणाले.

ree

“आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. काल संध्याकाळी पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं आहे. त्यांना ३१ मार्च २०२१ रोजी रुग्णालयात ॲडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत,” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली आहे.


 
 
 

Comments


bottom of page