top of page

शरद पवार यांचा आवाज काढून फसवणुकीचा प्रयत्न; दोघांना पुण्यातून अटक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आवाज काढून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून या दोन्ही आरोपींना जेरबंद केले. विकास गुरव आणि किरण काकडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांचीही २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. मंत्रालयात महसूल विभागातील एका अधिकाऱ्याच्या बदली संदर्भात आरोपींनी दूरध्वनी केला होता.

ree

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण काकडे याने लॅन्डलाईन क्रमांकावरुन मंत्रालयात फोन केला होता. आपण शरद पवार बोलत असून एका अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा, असे फर्मान मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावेळी आपण सिल्व्हर ओकवरून बोलत असल्याचे आरोपीने म्हटले होते. मात्र, शरद पवार त्यावेळी दिल्लीत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याप्रकरणी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर संपर्क साधत पडताळणी केली असता तेथून फोनच केला नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर मंत्रालयातून या फोनचा शोध घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


 
 
 

Comments


bottom of page