top of page

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी


ree

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली आहे. सिल्वर ओकवरील टेलिफोन ऑपरेटर पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात २९४, ५०६ (२) भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

ree




Comments


bottom of page