top of page

विश्वासघात ! जन्मदात्या आईला डोळे मिटून "ओम नमः शिवाय" म्हणायला सांगितलं, अन् विहिरीत ढकललं...

लग्नासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईलाच विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आईला विहिरीजवळ उभं करून तिला ‘ओम नमः शिवाय’ असं म्हणायला लावून मुलानं तिला चक्क विहिरीत ढकलून दिलं. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.

ree

कलाबाई आणि त्यांचा मुलगा पुष्कर (वय २२ ) मध्यप्रदेशातील रतलाममध्ये रहात आहेत. पुष्करला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र अनेक दिवसांपासून त्याचं लग्न जमत नव्हतं. आपल्याला लग्न करायचं असून त्यासाठी ५ हजार रुपयांची गरज असल्याचं त्यानं कलाबाईंना सांगितलं. मात्र कलाबाईंने पैसे नसल्यामुळे त्याला पैसे दिले नाहीत. याचा राग मनात धरून पुष्करनं आईचाच काटा काढायचा डाव आखला.

आपल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याकडे एक उपाय असल्याचं पुष्करने आईला सांगितलं. हातात नारळ घेऊन एका विहिरीच्या काठावर डोळे मिटून उभं राहुन ‘ओम नमः शिवाय’ म्हणायचं आणि नारळ विहिरीत फेकून द्यायचा, असं त्याने आईला सांगितलं. मुलावर विश्वास ठेवत आईने मंत्र म्हणण्यासाठी विहिरीच्या काठावर उभं राहत डोळे मिटले. त्यानंतर पुष्करनं पाठिमागून जोरदार धक्का देत आईला विहिरीत ढकललं. विहिरीत पडल्यानंतर मोटारीची वायर पकडल्यामुळे कलाबाई वाचल्या. शेजाऱ्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि पोलिसांना या प्रकाराची कल्पना दिली. शेजाऱ्यांनी सांगितल्यावरही कलाबाई आपल्या मुलाविरुद्ध तक्रार करायला तयार नव्हत्या. मुलाला कुठलाही त्रास होऊ नये, असंच त्यांचं म्हणणं होतं. लोकांच्या आग्रहानंतर त्यांनी तक्रार नोंदवली असली,


 
 
 

Comments


bottom of page