top of page

कौतुकास्पद! मोल मजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने थेट इस्रोपर्यंत मारली मजल

पंढरपूरच्या सोमनाथ माळीची इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

ree

पंढरपूर : भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोमध्ये इस्त्रोमध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण हेच स्वप्न जर उराशी बाळगून अत्यंत खडतर परिस्थितीत इच्छाशक्तीच्या जोरावर पंढरपूरच्या तरुणाने थेट इस्रोपर्यंत मजल मारली आहे. सोमनाथ नंदू माळी असे या तरुणाचे नाव असून तिरुअनंतपुरम (केरळ) येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून त्याची निवड झाली. विशेष म्हणजे यासाठी भारतातून दहा जणांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवड झालेला सोमनाथ हा एकमेव विद्यार्थी आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

सोमनाथ माळी मूळचा पंढरपुर तालुक्यातील सरकोली येथील. सोमनाथचे आईवडील आणि एक भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोल मजुरी करतात. शिक्षणातील काहीच गंध नसताना आपल्या मुलाने शिकून खूप मोठे व्हावे असे त्यांना वाटायचे. मात्र असे असतानाही सोमनाथने जिद्दीने शिक्षण घेतले. गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेतून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर सोमनाथने अकरावीला शास्त्र शाखेत पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे विनायक परिचारक यांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःतील क्षमतेची जाणीव होऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याचा निश्चय सोमनाथने केला. घरच्या परिस्थितीची जाणीव आणि जोडीला मित्र व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे २०११साली बारावी ८१ टक्के गुणांसह पास झाला. त्यानंतर सोमनाथ पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला. एमटेक पूर्ण केल्यानंतर कोठेतरी स्थिर व्हावे म्हणून त्याने इन्फोसेसमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी त्याला विमानाच्या इंजिन डिझाईनवर काम करण्याची संधी मिळाली. पण त्याला इस्रोमध्ये काम करायचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यानुसार त्याने त्या दिशेने प्रयत्न सुरु केले.

नोव्हेंबर 2019 मध्ये सोमनाथने इस्त्रोसाठी अर्ज केला. एमटेकचे शिक्षण आणि इन्फोसिस मधील नोकरीचा अनुभव यामुळे अखेर सोमनाथला 2 जूनला इस्रोमध्ये नोकरीची ऑफर आहे. यावेळी त्याची वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदासाठी निवड झाली आहे..


 
 
 

Comments


bottom of page