top of page

‘इसमें मुझे सैतान दिखता है’ म्हणत केला वृद्धावर हल्ला, उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू

सोलापूर :‘इसमें मुझे सैतान दिखता है’ असे म्हणत एका रुग्णाने त्याच वाॅडाॅमध्ये उपचार घेणाऱ्या ७० वर्षीय रुग्णावर सलाइनच्या स्टॅन्डने हल्ला केल्याची घटना घडली. डाेक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून पोलिसांनी या प्रकरणी युसूफ पिरजादे (वय ३४, विडी घरकूल, सोलापूर) याच्याावर गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर सौरभ संजय राऊत (वय २७, रा. शासकीय रुग्णालय वसाहत) यांनी सदर बझार पोलिसांत तक्रार दिली.

ree

एका ७० वर्षीय बेघर व्यक्तीच्या पायाच्या बोटाला जखम झाल्यामुळे त्याच्यावर बी ब्लॉकमध्ये उपचार सुरू होते. तर युसूफ पिरजादे याला ११ सप्टेंबर रोजी छातीमध्ये पाणी भरल्यामुळे बी ब्लॉकमध्ये भरती करण्यात आले होते. सोमवारी रात्री अचानक युसूफने ‘इसमें मुझे सैतान दिखता है’, म्हणत सलाइनच्या स्टॅन्डने या वृद्धाच्या डोक्यावर हल्ला केला. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे वाडाॅत भीतीचे वातावरण पसरले. वरिष्ठ डॉक्टर, पोलिस अधिकारी घटनास्थळी पाहणी करून चौकशी सुरू केली आहे.


 
 
 

Comments


bottom of page