top of page

जीपचा टायर फुटून भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर : जीपचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ घडली. मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारांसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जीपचालकाविरुध्द वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

ree

अक्कलकोट येथून एमएच १३ एएक्स १२३७ या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी जीप प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन सोलापूरकडे येत होती. भरधाव वेगातील जीपचे पुढील टायर फुटल्याने चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि सोलापूर – अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर जीप पलटी झाली. अपघातानंतर जीप १०० ते १५० फुटापर्यंत फरफटत गेल्याने जीपमधील सर्व प्रवासी रस्त्यावर उडून पडले होते. या अपघातात ५ ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन सोलापूरकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. .


Comments


bottom of page