top of page

कडक लॉकडाऊनपूर्वी सोलापुरात नागरिकांची खरेदीसाठी तुफान गर्दी; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

सोलापूर शहरात शनिवारपासून आठ दिवस कडक लॉकडाउन लागू होणार असल्याचे समजताच शुक्रवारी सोलापूर शहरातील बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. गुरूवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर शहरात शनिवार रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे नागरिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

ree

रूग्णसंख्या कमी करण्याच्या हेतूने सोलापूर जिल्ह्यात शनिवार रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याने आज (शुक्रवारी) सकाळपासूनच भाजीपाला, किराणा खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली. सर्वाधिक गर्दी शहरातल्या किराणा दुकानांवर झाल्याचं पाहायला मिळालं. डी मार्ट व साई सुपरमार्केट मध्ये सकाळ-सकाळीच नागरिकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.

ree

भाजी खरेदीसाठी नागरिकांनी स्टेशन रोड परिसरात तसेच इतर भाजी मंडईमध्ये गर्दी केली होती. कुठेही सोशल डिस्टंसिंगचे पालन होताना दिसले नाही. किराणा दुकानासमोर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.


 
 
 

Comments


bottom of page