top of page

व्हायरल पोस्ट ! तुमची शिफ्ट संपली आहे. ऑफिस सिस्टम १० मिनिटांत बंद होईल, कृपया घरी जा.

८ तासांची ड्युटी आता फक्त नावापुरती राहिली आहे. बऱ्याच कंपनीत कर्मचारी ८ तासांपेक्षा जास्त काम करतात. तास संपतात पण काम नाही. काहीजण नाईलाजाने तर काहीजण खुशीने ओव्हरटाईम करतात. पण भारतातील एका कंपनीने मात्र कर्मचाऱ्यांचे आठ तास ड्युटीचं स्वप्न खरं केलं आहे. महत्वाचे म्हणजे ८ तासांनंतर तुम्हाला ओव्हरटाईम करावा वाटला तरी तुम्ही तो करू शकणार नाही. कारण तुमची शिफ्ट संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यासाठी या कंपनीने कॉम्प्युटरमध्ये जबरदस्त सेटिंग केली आहे.

ree

बहुतेक कर्मचाऱ्यांची ऑफिसमध्ये ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं अशी तक्रार असते. काही जणांना तर या अतिरिक्त कामाचे अतिरिक्त पैसे देखील मिळत नाहीत. पण अशाच कर्मचाऱ्यांचा विचार मात्र भारतातील इंदौरमधील सॉफ्टग्रिड कॉम्पुटर्स ( SoftGrid Computers) कंपनीने केला. सॉफ्टग्रिड कॉम्पुटर्स या कंपनीने कॉम्प्युटरमध्ये तशी सेटिंग केली आहे. ज्यामुळे सिस्टमच कर्मचाऱ्यांना शिफ्ट संपल्यानंतर काम करण्यापासून रोखतं आणि घरी जायला सांगतं.

सॉफ्टग्रिड कॉम्पुटर्स या कंपनीच्या एचआर तन्वी खंडेलवाल यांनी linkedin वर फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये जो फोटो पोस्ट केला आहे, तो डेस्कटॉपचा फोटो आहे. त्या डेस्कटॉपवर

"Your Shift Time Is Over"

"The office system will shut down in 10 minutes"

"PLEASE GO HOME."

( सावधान! तुम्ही शिफ्ट संपली आहे. ऑफिस सिस्टम १० मिनिटांत बंद होईल. कृपया घरी जा.) असा मेसेज दिसत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ही पोस्ट पाहिल्यानंतर यावर बऱ्याच जणांनी कमेंटही केल्या आहेत.



Comments


bottom of page