top of page

सलमान खानला सर्पदंश

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला शनिवारी रात्री साप चावल्याचं समोर आलं आहे. सर्पदंश झाल्यानंतर सलमानला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. साप बिनविषारी असल्यानं मोठा धोका टळला आहे.

ree

नाताळ आणि बर्थडे सेलिब्रेशनसाठी सलमान काही जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत पनवेल इथल्या फॉर्महाऊसवर आला होता.शनिवारी रात्री फॉर्महाऊस परिसरात सलमानच्या पायाला सापानं दंश केला. साप चावल्यानंतर सलमानला तातडीनं रात्री तीन वाजतता कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. उद्या म्हणजेच २७ डिसेंबर रोजी सलमानचा वाढिदवस असून त्याच्या बर्थडेसाठी मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु आता बर्थडे सेलिब्रेशन होणार की, नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे.


 
 
 

Comments


bottom of page