top of page

‘बालिका वधू’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्रीसह सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात वयाच्या ४०व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

ree

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. त्याने बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.


गेल्या काही काळापासून तो अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही दिसत होता. तसेच, अलीकडेच अभिनेत्याने डिजीटल प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले. जिथे तो “ब्रोकन बट ब्यूटीफुल” मध्ये दिसून आला.




 
 
 

Comments


bottom of page