top of page

संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचं निधन

मुंबईः प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड (वय- 66 वर्ष ) यांचे कोरोनामुळे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना रहेजा इस्पितळात भरती करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज २२ एप्रिल रोजी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ree

गेल्या काही दिवसांपूर्वी श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील माहीममधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. श्रवण हे मधुमेहग्रस्त होते आणि त्यातच त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे हृदयाची गती मंदावली होती. तसेच अनेक आजारांनाही डोकं वर काढलं होतं. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.


नदीम-श्रवण या जोडीने पहिल्यांदाच 1979 मध्ये भोजपुरी चित्रपट ‘दंगल’मध्ये संगीत दिले होते. पण नदीम-श्रावण यांना खरी ओळख ‘आशिकी’ चित्रपटापासून मिळाली. या चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली. ‘आशिकी’ या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. 1990 च्या दशकात नदीम-श्रवण यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी दिली. या जोडीने 'आशिकी'नंतर, 'साजन', 'सडक', 'दिल है की मानता नही', 'साथी', 'दिवाना', 'फूल और काँटे', 'राजा हिंदुस्थानी', 'जान तेरे नाम', 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'राजा हिंदुस्थानी', 'दिलवाले', 'राज' अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.


 
 
 

Comments


bottom of page