top of page

भाजपला धक्का; जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन

जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपाला जळगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने जळगाव महापालिकेमधील सत्ता भाजपला गमावावी लागली आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करत महापौरपद मिळवलं आहे.

ree

जयश्री महाजन यांना ४५ मतं , तर प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. भाजपाचे २७ नगरसेवक फुटल्याने आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे. एकूण ७५ सदस्य असणाऱ्या महापालिकेत भाजपचे ५७, शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन असे संख्याबळ होते.


 
 
 

Comments


bottom of page