top of page

शिल्पा शेट्टीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांना मुंबईतील अंधेरी कोर्टाने समन्स बजावले आहे. २१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत अंधेरी न्यायालयाने त्यांना २८ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

ree

शिल्पाच्या दिवंगत वडिलांनी २१ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते जानेवारी २०१७ मध्ये व्याजासह द्यायचे होते, असा दावा व्यावसायिकाने केला आहे. मात्र, कर्ज फेडण्याआधीच ११ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर शिल्पा, शमिता आणि त्यांच्या आईने कर्ज फेडण्यास नकार दिला.


 
 
 

Comments


bottom of page