top of page

शेगाव-अकोट मार्गावरील वाहतूक ठप्प

अकोला: दोन दिवसांपूर्वी अकोट-शेगाव मार्गावरील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोहारा गावानजीक मन नदीवरील पुलाचा काही भाग खचला होता. शनिवारी या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने माती आणि मुरूम टाकून या मार्गावरून वाहतूक सुरू केली होती. मात्र, आज सकाळीच पुन्हा याच ठिकाणी मालवाहू ट्रक फसला. त्यामुळे अकोट- शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद झाली होती.

ree

हा पूल बराच जीर्ण झाला आहे. बाजूलाच नवीन पुलाचे बांधकाम सुरु असून कंत्राटदाराने जुन्या पुलाजवळ खोदकाम केल्यामुळे हा अपघात घडला होता.

या घटनेला दोन दिवसाचा अवधी उलटला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग इकडे लक्ष देत नसल्याने स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच नवीन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करावे, अशी मागणीही होत आहे.


 
 
 

Comments


bottom of page