top of page

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा दिल्लीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचं समोर येतंय. शर्मा यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

ree

राम स्वरूप शर्मा हे भाजपाचे खासदार असून, ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाजवळ खासदारांचं निवासस्थान आहे. याच खासदार निवासात ६२ वर्षीय शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शर्मा यांच्या निधनामुळे भाजपनं आज होणारी संसदीय दलाची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला

 
 
 

Comments


bottom of page