top of page

शक्तीमिल बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

आरोपींची फाशीची शिक्षा रद्द; तिघांनाही हायकोर्टाकडून जन्मठेप

ree

मुंबईः बहुचर्चित शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २०१४ मध्ये तीनही आरोपींना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. आज त्यावर अंतिम सुनावणी करत मुंबई हायकोर्टाने आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल परिसरात २२ ऑगस्ट २०१३ रोजी एका महिला फोटोग्राफरवर सामुहिक बलात्कार करण्यात झाला होता. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. यात विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. यातील सिराज खानला मुंबई सत्र न्यायालयाने आधीच जन्मठेप दिली होती. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठण्यात आले होते. तर उर्वरीत विजय जाधव, सलीम अन्सारी आणि कासिम बंगाली या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या या निकालाविरोधात त्यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते.




 
 
 

Comments


bottom of page