top of page

Video: लंडनच्या रस्त्यावर सौरव गांगुलीचा डान्स, व्हिडिओ व्हायरल

मुंबई: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काल ( ८ जुलै ) आपला ५० वा वाढदिवस खास मित्र आणि कुटुंबीयांसमवेत लंडनमध्ये साजरा केला. यावेळी ‘ओम शांती ओम’, ‘तू मेरा हिरो’ गाण्यावर सौरवने ठेका धरला होता. लंडनच्या रस्त्यावरील गांगुलीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पत्नी डोना आणि मुलगी सना सुद्धा सोबत दिसतेय. गांगुलीने मुलगी सनासोबत वायलनच्या धुनवर सुद्धा डान्स केला.

याआधी सौरवने आपला मित्र आणि सलामीवीर सचिन तेंडुलकरसोबत प्री बर्थ डे पार्टी सेलिब्रेट केली. सचिनशिवाय बीसीसीआयचे अधिकारी सुद्धा या पार्टीमध्ये दिसले होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह सुद्धा गांगुलीसोबत होते. राजीव शुक्ला यांनी स्वत: टि्वटरवर प्री-बर्थ डे पार्टीचे फोटो पोस्ट केलेत.


 
 
 

Comments


bottom of page