top of page

सोनिया गांधींना ईडीचे समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावले आहे. नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी २१ जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही सहा दिवस ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

ree

या अगोदरही सोनिया गांधी यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. मात्र, कोविड आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे सोनिया गांधी यांनी ईडीला पत्र लिहून त्या पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांची हजेरी काही आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ईडीनेही ही मागणी मान्य करत सोनिया गांधी यांना चार आठवड्यांचा कालावधी दिला होता. हा कालावधी २१ जुलैरोजी संपत असल्यामुळे ईडीने त्यांना पुन्हा चौकशीचे समन्स बजावले आहे.


Comments


bottom of page