top of page

‘त्या’ विधानाशी आमचा संबंध नाही; ‘सीरम’चं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेवर सीरमने स्पष्टीकरण दिलं असून जाधव यांच्या वक्तव्याशी कंपनीचा काहीही संबंध नाही, असं सीरमने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला 22 मे रोजी पत्रं पाठवून सीरम इन्स्टिट्यूटच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच जाधव यांनी जे सांगितलं तो आमचा विचार नाही. हे मी तुम्हाला सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावतीने सांगत आहे, असं सिंह यांनी या पत्रात म्हटलं आहे.

ree

कोविशील्डचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच कोविड 19 विरोधातील लढाईत आम्ही सरकारच्या सोबत आहोत, असं सांगतानाच पुनावाला हेच आमच्या कंपनीचे एकमेव अधिकृत प्रवक्तेही असल्याचं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page