top of page

मोदी सरकारने फेटाळला सिरमचा प्रस्ताव

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसत आहे. त्यात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिमेलाही थंडावली आहे. देशात निर्माण होणाऱ्या लसींचा पुरवठा सर्वात आधी राज्यांना केला जावा आणि त्यानंतरच निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

ree

देशात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण केलं जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांकडून लसीची मागणी होत आहे. दरम्यान, सिरमचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर कोविशिल्ड लसीचे हे ५० लाख डोस आता देशातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.


 
 
 

Comments


bottom of page