top of page

स्कुल बस खड्ड्यात कलंडली; ५० विद्यार्थी थोडक्यात बचावले

मुंबई : नायगाव मध्ये बुधवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूल बस रस्त्याच्या कडेला कलंडली, मात्र, बस चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये जवळपास ५० विद्यार्थी होते. बस एका बाजूने कलंडल्याने त्यात असलेली मुलंही घाबरली होती. मुलांचा गोंधळ पाहून आजूबाजूच्या लोकांनी बसच्या दिशेने धाव घेतली. बसमधील सर्व विद्यार्थ्यांना खिडकीतून आणि बसच्या पाठीमागील इमर्जन्सी विंडोमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दुसरी बस बोलावून मुलांना घरी पाठवण्यात आलं.

ree

अवर लेडी ऑफ वेलंकनी या शाळेची बस बुधवारी शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. दरम्यान, नायगाव येथील सनटेक जवळील भागात पोहचताच वाहन चालकाचा अंदाज चुकला आणि बस रस्ता सोडून रस्त्याच्या कडेला घसरली आणि बस एका बाजूला कलंडली. सुदैवाने , बस चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
 
 

Comments


bottom of page