top of page

हृदयद्रावक! अपघातानं संपूर्ण कुटुंबच संपवलं

भरधाव ट्रकने कारला धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये संपूर्ण कुटुंबाचाच अंत झाला आहे. कारमधील पती-पत्नी आणि मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलाचा जबलपूरमधील रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री उशिरा सतना (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील मैहरमधील जीतनगरजवळ झाला. दरम्यान, पती पत्नी आणि मुलगा मुलगी यांच्यावर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.

ree

सत्यम उपाध्याय (४० वर्षे) यांचे जमताल येथे मोबाईलचे दुकान होते. कुटुंबासह एका लग्न समारंभासाठी ते सतना येथे आले होते. विवाह सोहळ्यामध्ये उपस्थिती लावून हे कुटुंब माघारी परतत होते. त्यादरम्यान बुधवारी रात्री उशिरा सतना जिल्ह्यातील मेहरमधील जीतनगरजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कार ( MP -19 CA- 4123 ) ला समोरून धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की मोठा आवाज झाला आणि संपूर्ण कुटुंब काही क्षणात संपले. पती-पत्नी आणि मुलीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर मुलाचा जबलपूरमधील रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.दरम्यान, पोलिसांना ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात जमताल येथील सत्यम उपाध्याय, त्यांची पत्नी मोनिका (३५ वर्षे), मुलगी इशानी (८ वर्षे ) आणि मुलगा स्नेह (१० वर्षे) यांचा मृत्यू झाला. या सर्वांवर एकाच चितेवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
 
 

Comments


bottom of page