top of page

बायकोशी झालेल्या भांडणातून पेटवलं स्वतःचं घर; आजूबाजूची दहा घरं जळून खाक...

सातारा : पती - पत्नी च्या भांडणातून पतीने स्वतःच्याच घराला आग लावली. मात्र या आगीमुळे आजूबाजूची दहा घरंही जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे काल (सोमवारी) सायंकाळी हा प्रकार घडला आहे. या घटनेत सुमारे पन्नास लाख रुपयाहून अधिक किमतीचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

ree

या बाबत मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे सुरु होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला. नंतर या आगीने रौद्ररुप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला. ही सर्व घरे जळून खाक झाली. या आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी आरोपी पती संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


 
 
 

Comments


bottom of page