top of page

माझ्या हत्येचा कट रचला जातोय; गायिकेच्या फेसबुक पोस्टने खळबळ

मुंबई - सारेगमप २००९ चे विजेतेपद पटकावणारी गायिका वैशाली भैसने हिने आज फेसबुकवर "काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय." अशी पोस्ट केली आहे. तसंच यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, २ दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट करणार असल्याचंही तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

वैशाली भैसने ही महाराष्ट्रातील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. सारेगमप २००९ चे विजेतेपद पटकावल्यानंतर वैशाली "सूर नवा ध्यास नवा", "बिग बॉस मराठी" या सारख्या इतर शोमध्येही झळकली. काही महिन्यांपूर्वीच तिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. वैशालीने हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.


Commentaires


bottom of page