top of page

संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

१३० जणांचे रक्तदान

देसाईगंज : संत निरंकारी मंडळ, शाखा - वडसा (देसाईगंज) च्या वतीने आज संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज (वडसा) येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले. यावेळी १२० पुरूष व १० महिला असे एकूण १३० लोकांनी स्वंयस्फूर्तीने रक्तदान केले. कोरोनाच्या प्रार्दुभावात रक्तपेठी, जिल्हा रूग्णालय, गडचिरोली येथे रक्ताची टंचाई झाल्यामुळे त्यांनी मंडळाला रक्तदान शिबीरासाठी विनंती करताच मंडळाद्वारे मानवसेवेसाठी तातडीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले.

शिबीराचे उद्घाटन संत निरंकारी मण्डळाचे वडसा झोनचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांनी स्वतः रक्तदान करून केले. या प्रसंगी आसाराम निरंकारी, संयोजक वारसा ब्राँच, हरीष निरंकारी, सेवादल क्षेत्रीय संचालक, रामलाल निरंकारी, प्रचारक अशोक बोरकुटे, चामोर्शी, श्रीरामजी सपाटे, आरमोरी, आनंदराव पारधी, पुयार, नानक कुकरेजा, पुरूषोलम डेंगानी,रोशन नागदेवे, दिपक कुकरेजा,कटैयालाल डेंगानी, मोतीलाल कुकरेजा आदी उपस्थित होते.

शिबीराला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचे हस्ते रक्तदात्यांना प्रमाणत्राचे वाटप करण्यांत आले. शिबीर यशस्वी करण्यांसाठी गडचिरोली येथील डॉ. अंजली साखरे, डॉ. प्रणय कोसे, सतीश तडकलावार, नरेश कंदपूरीवार, पंकज निखाडे, व्यंकटेश डिकोजवार, मुरलीधर पिट्टीवार, प्रमोद देशमुख, वंसत नान्हे विनोद गोन्नाडे, स्वप्निल चाफले, कु. प्रतिक्षा काटेंगे, सुरेश चांदेकर, संदीप तुमनोरी, पवार आदींनी सहकार्य केले. शिबीरात संत निरंकारी मंडळाचे स्थानिय शाखेतील सर्व सेवादल, महीला, पुरूष सदस्यांनी गणवेशात सेवाकार्य केले.


 
 
 

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.
bottom of page