top of page

... अन् ऊर्जामंत्र्यांनी स्वतःच केलं शहर सॅनिटाइज

ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर हे मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यातील कोविड-19 चे प्रभारी मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य विषयक सेवेंवर बारीक लक्ष असते. शनिवारी ते ग्वालियर जिल्ह्यातील ग्रामीण भागांच्या दौऱ्यावर होते. डबरा शहरातील एक कर्मचारी सॅनिटायझेशन मशीनसोबतच घरामध्ये झोपल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तोमर अधिकाऱ्यांवर भडकले आणि त्यांनी स्वतःच सॅनिटायझेशन मशीन आपल्या पाठीवर घेत डबरा शहर सॅनिटाईज करण्याचं काम सुरू केलं.

ree

डबरा शहर सॅनिटाईज होत नसल्यानं मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फटकारलं. सकाळी 11 वाजेपर्यंत सॅनिटायझेशन का झालं नाही? असं अधिकाऱ्यांना विचारलं. तेव्हा अशी माहिती मिळाली की कर्मचारीच आला नाही. जेव्हा कर्मचाऱ्याला फोन केला तेव्हा समजलं की तो सॅनिटायझेशन मशीन घरी घेऊन झोपला आहे. हे ऐकून मंत्र्यांनी लगेचच सॅनिटायझेशन मशीन मागवून घेतली. कोणताही विचार न करता स्वतः ही मशीन पाठीवर घेत ते डबरा शहरात निघाले. त्यांनी जवळपास एक तास शहरातील रस्त्यांवर आणि बाजारात सॅनिटायझेशन केलं. यानंतर त्यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना शहरात सतत सॅनिटायझेशन करण्याचा सल्ला दिला.


मंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनी डबरा सिव्हिल हॉस्पिटलची पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता आणि रुग्णांच्या इतर तक्रारी ऐकल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना फटकारले. त्याचबरोबर रुग्णांना योग्य उपचारांची व्यवस्था करण्याचे आश्वासनही दिले.


 
 
 

Comments


bottom of page