top of page

व्हिडीओ : थेट पोलिसांवरच हल्ला

अहमदनगर: राज्यात कोरोनाचं संकट वाढत असल्याने निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांनी तर कडक लॉकडाउन लावला आहे. मात्र अद्यापही नियमांचं उल्लंघन होत असताना दिसत आहे. असाच प्रकार संगमनेर शहरातील दिल्ली नाका चौकात दिसून आला. या चौकातील नागरिकांची उसळलेली गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर सुमारे शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने हल्ला केला. जमावाकडून पोलिसांना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये जमाव पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर पोलीस कर्मचारी जीव वाचवून धावत असताना त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत.

ree

शहरातील या चौकात राज्य राखील दलाची तुकडी तैनात आहे. गर्दी जमल्याने ती पांगविण्यासाठी पोलिस गेले. तेव्हा पोलिसांची जमावासोबत बाचाबाची झाली. पोलिसांना जमावातील काही जणांनी धक्काबुक्की करत त्यांच्यावरच हल्ला केला. जमाव वाढत जाऊन दगडफेकही सुरू झाली. चौकात एका झाडाखाली पोलिसांनी उभारलेला तंबूही जमावाने उखडून टाकला. जमावाच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी होती. शिवाय जमाव आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला. दगडफेकीत दोन पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दगडफेकीत काही खासगी वाहनांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी जमावाला तेथून हटवण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी सहा अज्ञातांविरोधात दंगलीसह सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. घटनेनंतर बहुतांश आरोपी पळून गेले असून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.


 
 
 

Comments


bottom of page