top of page

प्रसिद्ध कब्बडीपटू संदीप नांगलची गोळ्या घालून हत्या

प्रसिद्ध कब्बडीपटू संदीप नांगल याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबमधील शाहकोट येथील मल्लियन खुर्द गावामध्ये सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. मल्लियन खुर्द येथे कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये संदीप सहभागी झाला होता. कब्बडी सामन्यादरम्यान चार अनोळखी व्यक्तींनी संदिपवर गोळीबार केला.

घटनास्थळी १० गोळ्यांच्या रिकाम्या नळ्या सापडल्या आहेत. संदीपवर हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत त्याला नाकोडर येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याला तिथे मृत घोषित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


 
 
 

Comments


bottom of page