top of page

Video: समांथा रुथ प्रभूने विमानतळावर केलेला डान्स पाहिलात का ?

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. त्यानंतर तिने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात पहिल्यांदाच ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँग केले त्यामुळे ती चर्चेत होती. समांथा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क मध्यरात्री विमानतळावर डान्स करताना दिसत आहे.

डान्स करतानाचा हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘आणखी एक रात्री उशिराची फ्लाइट…’ असं कॅप्शन दिले आहे. काही तासातच हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाल्याचे दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.



Comments


bottom of page